सोलापूर शहरात कलम 37 (3) चा मनाई आदेश लागू
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12.00 वाजले पासून ते 9 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लागू राहणार आहे. तरी नागरिकांनी शांतता राखून कायदा व सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. आश्विनी पाटील यांनी केले आहे.
लागू असलेले प्रतिबंध
पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास मनाई
कोणत्याही प्रकारची मिरवणूक बंदी
मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड, फटाके यांचा वापर निषिद्ध
सवलत दिलेले कार्यक्रम -
- विवाह समारंभ
- अत्यसंस्कार व संबंधित सभा
- कंपन्या, क्लब, सहकारी संस्था यांची कायदेशीर बैठका
- सामाजिक मेळावे व संस्थांचे सामान्य व्यवहार
- चित्रपटगृहे, नाटकगृहे व सार्वजनिक करमणूक कार्यक्रम
- सरकारी व निमसरकारी कार्य, न्यायालये व कार्यालयीन संमेलने
- शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक उपक्रम
- कारखाने, दुकाने व आस्थापनातील व्यापार व्यवहार
- विभागीय पोलीस उपआयुक्त यांच्या परवानगीने होणारी संमेलने.

0 Comments