Hot Posts

6/recent/ticker-posts

बाबाराजे देशमुख यांच्या भाजपा प्रवेशाने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार

 बाबाराजे देशमुख यांच्या भाजपा प्रवेशाने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार


 नातेपुते (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख व त्यांचे सहकारी यांचा शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे त्यासाठी जलसंधारण व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे, मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा.आमदार रामभाऊ सातपुते व अनेक भाजपाचे प्रतिष्ठित मान्यवर नातेपुते येथे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख व त्यांचे सहकारी भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याने माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार आहे.माळशिरस तालुक्याच्या राजकारणाचा विचार करता माळशिरस तालुक्यामध्ये पश्चिम भागात सहकार महर्षी पासून ते आजच्या पिढीपर्यंत मोहिते पाटील घराण्याला समाज भूषण नानासाहेब देशमुख यांच्या पासून शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख यांनी सदैव साथ दिली त्यामुळे मोहिते पाटील यांचा माळशिरस तालुक्यातील पश्चिम भाग हा सुरक्षित होतात परंतु शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पश्चिम भागात मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. मोहिते पाटील घराणे कोणत्याही पक्षात असो त्यांना सदैव साथ देण्याची भूमिका देशमुख परिवाराने नेहमीच घेतली होती परंतु आज भाजप पक्ष प्रवेशाच्या निर्णयामुळे भाजपला देशमुख परिवाराचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.  

माळशिरस तालुक्यात माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी पक्ष वाढीसाठी व आगामी जिल्हा परिषदे साठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यामध्ये पश्चिम भागातील बाबाराजे देशमुख सारखे एक मोठे नेतृत्व व पश्चिम भागातील बहुसंख्य गावामध्ये बाबाराजे देशमुख यांचा असलेला दांडगा जनसंपर्क व त्यांना मानणारा वर्ग त्यांच्या पाठीमागे भाजपमध्ये जाणार असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निश्चितच मोठा फरक पडणार आहे. बाबाराजे देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे पश्चिम भागात निश्चित भाजपमय वातावरण होईल असे चित्र दिसू लागले आहे.पक्षप्रवेशाचा कार्यक्रम नातेपुते येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात होणार आहे. कार्यक्रमाचे जोरदार नियोजन सुरू असून पाच हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी आसन क्षमता त्या ठिकाणी करण्यात आली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments