Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व; ११ नगरसेवकांच्या विजयानंतर नूतन नगरसेवकांनी घेतली पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट

 मोहोळ नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व; ११ नगरसेवकांच्या विजयानंतर नूतन नगरसेवकांनी घेतली पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट

मोहोळ(कटूसत्य वृत्त):-मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दैदीप्यमान यश संपादन करत शहरात 'नंबर वन'चा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या ११ नूतन नगरसेवकांनी माजी आमदार मा. राजनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मोहोळ नगरपरिषद निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या.

मोहोळ व अनगरच्या विकासासाठी पालकमंत्र्यांचे खंबीर पाठबळ मिळावे: राजनजी पाटील

या भेटीदरम्यान माजी आमदार राजनजी (मालक) पाटील यांनी अनगर आणि मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले की, "नगराध्यक्षपदाचा निकाल निसटत्या मतांनी विरोधात गेला असला तरी, जनतेने ११ नगरसेवक निवडून देऊन भाजपवर मोठा विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पालकमंत्र्यांनी मोहोळच्या विकासाकडे अधिक लक्ष द्यावे. त्यांच्या खंबीर पाठबळामुळेच शहराच्या विकासाला नवी गती मिळेल."

कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ : सुशील क्षीरसागर

निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "आम्ही प्रचारात जो विकासाचा अजेंडा मांडला आहे, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रभाग १ ते १० मधील सर्व विजयी नगरसेवक, निवडणूक लढवलेले उमेदवार आणि रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच हा विजय शक्य झाला आहे," असे क्षीरसागर यांनी नमूद केले.

उपस्थित मान्यवर व नूतन नगरसेवक:

यावेळी सोलापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत (नाना) चव्हाण, निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांच्यासह बाळासाहेब भाऊ गायकवाड, शंकरराव वाघमारे,सोमेश क्षीरसागर, मुजीब मुजावर,संजीव खिलारे, सुरेश राऊत,महेश सोवनी, अनिस कुरेशी, शकील शेख, विकास वाघमारे,हेमंत गरड, नूतन नगरसेवक सतीश काळे, दत्तात्रय खवळे, मुश्ताक शेख, संतोष सुरवसे, रोहित आण्णा फडतरे, एजाज तलफदार, रुपेश धोत्रे, श्री बरे , अझरुद्दीन कुरेशी, प्रमोद डोके, प्रशांत गाढवे , संतोष वायचळ, अमोल गायकवाड, आबा आंडगे,संतोष खंदारे, विश्वराज भोसले, अझरुद्दीन शेख, इबु शेख, डॉ. किरण माने, सागर लेंगरे, द्रोणाचार्य लेंगरे, तुळजाराम धोत्रे  इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments