Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा ग्रंथालय संघाचे रविवारी अधिवेशन

 जिल्हा ग्रंथालय संघाचे रविवारी अधिवेशन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे 46 वे वार्षिक अधिवेशन रविवार दि. 28 डिसेंबर 2025 रोजी हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय, अरण ता. माढा येथील "यशोदा गुरुकुल सभागृह" येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष विजयकुमार पवार आणि उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          या अधिवेशनाचे उद्घाटन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. अभिजीत पाटील राहणार आहेत. दिनदशिकिचे प्रकाशन डॉ. गजानन कोटेवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी  संस्थापक, स्वेरी, गोपाळपूर, पंढरपूरचे प्रा. डॉ. बी.पी. रोंगे,
जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, प्र. ग्रंथालय संचालक, मुंबई 
अशोक गाडेकर,सहाय्यक ग्रंथालय संचालक, पुणेचे 
शालिनी इंगोले,   जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे,
 माजी सभापती भारत शिंदे, शिवाजी कांबळे, बाळासाहेब पाटील,  माजी ग्रंथनिवड समिती सदस्य कुंडलिक मोरे,
 सोपानराव पवार, गुलाबराव पाटील, कार्याध्यक्ष म.रा.ग्रं. संघ,  प्रमोद पाटील,  राम मेकले, भिमराव पाटील उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात प्रेरणादायी वक्ते सुभाष रणदिवे हे "ग्रंथालय - समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम" या
विषयावर व्याख्यान देणार आहेत. खुल्या अधिवेशनात विविध विषयाचे ग्रंथालय संबंधीचे ठराव पारीत करुन शासनाकडे पाठविण्यात येणारे आहे. अधिवेशनस्थळी सायंकाळी 5 वाजता सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूरची वार्षिक सर्व साधारण सभा होणार आहे. यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
          या पत्रकार परिषदेस साहेबराव शिंदे, कुंडलिक मोरे, सारिका माडीकर , वृषाली हजारे आदी उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments