सोलापूर शहरात कलम 37 (1) (2) लागू
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) (2) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेला हा आदेश 26 डिसेंबर 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 9 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 24.00 वाजेपर्यंत प्रभावी राहील, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. आश्विनी पाटील यांनी दिली.
या आदेशानुसार खालील गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे:
- मिरवणुका, सभा, पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव
- शस्त्रे, सोटे, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू
- ज्वालाग्राही व स्फोटक पदार्थ
- दगड, फेकावयाची उपकरणे, प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन
- सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव, ग्राम्य भाषा
- जाती-धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे, चिन्हे किंवा साहित्य
हा आदेश ज्या सरकारी नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी उपनिर्दीष्ट वस्तु हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे. अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहुन सदरचे आदेश लागु पडणार नाहीत.
पोलीस प्रशासनाने शहरातील नागरिकांनी शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
0 Comments