बसव ब्रिगेडला यापुढे बळ देणार : शशिकला जोल्ले
बसव ब्रिगेडच्या बसवरत्न पुरस्कारांचे वितरण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक संस्थांची समाजाला गरज असते. त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यास मदत होते. गेल्या केवळ चारच वर्षाच्या काळात केलेले बसव ब्रिगेडचे काम उल्लेखनीय आहे. यापुढील काळात बसव ब्रिगेडला आणखीन बळ देणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व आ. शशिकला जोल्ले यांनी केले.
बसव ब्रिगेडतर्फे देण्यात येणाऱ्या बसव रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर, माजी नगरसेवक नरेंद्र काळे, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, स्वागताध्यक्ष नागप्पा जामगोंडी, कार्याध्यक्ष ऍड, शिवशंकर काडादी, बसवराज बिराजदार, बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमित रोडगे आदी उपस्थित होते.
यावेळी भोसीकर म्हणाले की बसव ब्रिगेडच्या माध्यमातून लिंगायत समाजाच्या विकासास हातभार लागत आहे. समाजाचे अनेक प्रश्न राज्य पातळीवर व केंद्रीय पातळीवर सोडवून घेण्यात येत आहेत. त्यावेळी समाजाने बसव ब्रिगेडच्या सोबत राहणे आवश्यक आहे.
यावेळी पुरस्कारप्राप्त मनोगतात वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले म्हणाले की, बसव ब्रिगेडतर्फे बसवेश्वरांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने आमच्या संघटनेची उंची वाढली आहे आणि यामुळे संघटनेस काम करण्यास प्रचंड ऊर्जा प्राप्त झाली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार बसवराज चाकाई यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दयानंद भोरे, सकलेश बाभुळगावकर, राहुल जत्ती, ऍड. विनय कटारे, जतिन निमगाव, सिद्धांत रंगापुरे, सिद्धाराम छपेकर, अविनाश बिराजदार, भरत कुरणे, दत्तात्रय केरे, मळसिद्ध रोकडे, सुधाकर कोरे, अमरनाथ दामा, विशाल पाटील, सिद्धार्थ चितळे, स्वप्निल नष्टे, योगीराज किणगी, शरणकुमार कुंभार, नितीन गंगदे, पंडित जळकोटे यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : बसव ब्रिगेडच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी शशिकला जोल्ले, अण्णासाहेब जोल्ले, अविनाश भोसीकर, नरेंद्र काळे, श्रीशैल हत्तुरे, नागप्पा जामगोंडी, ऍड, शिवशंकर काडादी, अमित रोडगे
चौकट :
हे ठरले पुरस्काराचे मानकरी
बसव ब्रिगेडतर्फे अण्णासाहेब जोल्ले आणि शशिकला जोल्ले यांना राज्यस्तरीय शरण दंपत्ती, बसवराज तंबाके यांना जीवन गौरव, लिंगायत अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ, सामाजिक संस्था पुरस्कार वीरशैव व्हिजन अध्यक्ष राजशेखर बुरकुले, महिला प्रबोधन राहुल बिराजदार, अंतराळ संशोधन बिल्वा गिराम हिच्या वतीने तिचे वडील अनिल व आई माधुरी गिराम, सोलापूर गौरव श्याम धुरी, रोजगार निर्मिती रमेश वायचळ यांना बसवरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

0 Comments