जनता सहकारी बँकेच्या माढा शाखेचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त माढा शाखेतर्फे आयोजित ग्राहक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यास माढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मीनल साठे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मनकर्णिका पतसंस्थेचे चेअरमन झुंजार भांगे, लोकमंगल पतसंस्थेचे संचालक शहाजीराव साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात राजेंद्र फडतरे व भारत गवळी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्ज मंजुरी पत्रे देण्यात आली. बँकेच्या विविध कर्ज योजना व ठेवींबाबत सविस्तर माहिती बँकेचे सिनीयर ऑफिसर सुहास मुळजकर यांनी दिली.
ग्राहक खातेदार मगन सावंत, मदन मुंगळे, सुधीर कुलकर्णी व अ. रहीम पठाण यांनी मनोगत व्यक्त करत बँकेच्या सेवा, विश्वासार्हता व शाखाव्यवस्थापक दत्तात्रय मनसुखे यांच्या कार्याचे कौतुक केले.
प्रमुख पाहुण्या मीनल साठे यांनी आपल्या भाषणात जनता बँकेची सेवा उत्तम असल्याचे नमूद करत बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी झुंजार भांगे व शहाजीराव साठे यांनीही बँकेच्या प्रगतीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
समारोपाच्या भाषणात उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी यांनी ग्राहकांनी बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच माढा नगरपरिषदेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजना राबविल्यास बँक अर्थसहाय्य करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ग्राहक मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुहास मुळजकर यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी शाखाव्यवस्थापक दत्तात्रय मनसुखे व शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments