Hot Posts

6/recent/ticker-posts

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या युवकास जामीन मंजूर

 जन्मठेपेची शिक्षा झालेल्या युवकास जामीन मंजूर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नाना अण्णा वाघमोडे यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला किरण महादेव वाघमोडे राहणार फोंडशिरस, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांस कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक व अजित कडेठाणकर यांनी अपिलात जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, यातील मयत व आरोपी हे एकमेकांचे शेजारी राहण्यास होते. त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता मयताचे घर हे आरोपींच्या जागेत येत असल्याने ते घर काढून टाकण्यासाठी दोघात वाद झाला होता. दिनांक 19/10/2019 रोजी मयत व त्याचा नातू तुषार हे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. साधारण चार वाजाच्या सुमारास यातील आरोपी मयताचे घरासमोर येऊन मयताचा मुलगा, त्याची बायको व सून यांना जनावरे हे आमच्या रानात बांधू नका म्हणून शिवीगाळ केली होती, तसेच तुला व तुझ्या वडिलांना जिवंत सोडणार नाही असे म्हणाले होते. त्यानंतर थोड्यावेळाने घराच्या पाठीमागून मेलो मेलो म्हणून असा मोठा आवाज आला.

त्यावेळी मयताचे घरचे हे पळत गेले त्यावेळी वरील आरोपी हा पळून जात होता, मयत खाली पडला होता त्यावेळी मयताचा नातू तुषार याने सांगितले की, जागेच्या कारणावरून आरोपी किरण वाघमोडे, धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे यांनी लोखंडी रॉड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती, अशा आशयाची फिर्याद मयताचा मुलगा बापू नाना वाघमोडे याने नातेपुते पोलीस ठाण्यात दिली होती.

सदरचा खटला हा माळशिरस सत्र न्यायालयात चालला होता, न्यायाधीशांनी आरोपींस खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

त्यावर आरोपी किरण याने ॲड. रितेश थोबडे यांचेमार्फत उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. अपिलात किरण याचा जामीन अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीच्या वेळी, सदर खटल्याच्या झालेल्या साक्षी पुराव्यावरून सकृतदर्शनी असे दिसून येते की, सदरचा खटला हा खुणाच्या संज्ञेत बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपींस जामिनावर मुक्त केले.
यात आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे, ॲड. निशांत लोंढे तर सरकारतर्फे ॲड. एस एन देशमुख यांनी काम पाहिले. 

Reactions

Post a Comment

0 Comments