Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपाचे संकल्पपत्र ही 2029 पर्यंत राज्याच्या वेगवान विकासाची हमी

 भाजपाचे संकल्पपत्र ही 2029 पर्यंत राज्याच्या वेगवान विकासाची हमी 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

महायुतीचीच सत्ता येणार;महाविनाश आघाडीला जनता धडा शिकवेल








  

भारतीय जनता पार्टीचे संकल्पपत्र हे 2029 पर्यंत राज्य विकासाची व्यापक दृष्टी आणि त्या दिशेने वेगाने कृती करण्याची खात्री देणारे आहे. महायुती सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांच्या विकासासाठी कार्यरत आहे. राज्यातील जनतेचे जीवन उज्वल आणि सुकर व्हावे यासाठी महायुती सरकार काम करत आहे. विकसित महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकारच हवे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. भाजपा मीडिया सेंटरमधील या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सय्यद जफर इस्लामप्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येप्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बनप्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. जनतेच्या मनात कायम भ्रम निर्माण करून आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविनाश आघाडीचा पराभव निश्चित असून विधानसभा निवडणुकीत जनता आघाडीला धडा शिकवेल आणि महायुतीचेच सरकार सत्तेवर आणेलअसा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
श्री. गोयल म्हणाले कीकेंद्रातील एनडीए सरकारच्या साथीने महायुती सरकार तिप्पट वेगाने प्रगती करून तिप्पट परिणाम साध्य करत आहे. जनता त्याचा अनुभव घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाला नव्या उर्जेसोबत विकासाचे नवे पंखही दिले आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत केंद्र आणि राज्यातील सरकारच्या जनकल्याणाच्या योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी आमचे सरकार तत्पर आहे. तर दिलेले कोणतेही आश्वासन न पाळणा-या महाविनाश आघाडीने दिलेल्या वचनांवर जनतेचा आता काडीमात्र ही विश्वास नाही. काँग्रेसने त्यांची सत्ता असलेल्या राज्यांमधील शेतकरीयुवावर्गाची दिशाभूल करून एकाही आश्वासनाची पूर्तता न करता निव्वळ फसवणूक केली आहे याची ही आठवण त्यांनी करून दिली. महाविनाश आघाडीचा पराभव निश्चित असून महायुतीचे भवितव्य उज्ज्वल आहे असेही  त्यांनी नमूद केले.उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत श्री. गोयल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपायी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना मूठमाती दिली अशी बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल दोन वाक्ये वदवून घ्यावीत. ते त्यांना अजिबात जमणार नाही. त्यामुळे महाभकास आघाडीत त्यांचे काहीच चालत नाहीहेही स्पष्ट झाल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले. देशातील 140 कोटी जनतेच्या एकत्रित विकासाची चिंता केली तरच हा देश सुरक्षित राहीलअशी नरेंद्र मोदी यांची धारणा आहे. धर्मजातभाषा आणि प्रांतानुसार होणारी वाटणी आम्हाला मान्य नाही. आम्ही सर्वांनाच एकत्र घेऊन वाटचाल करत असल्याने आम्हाला सर्वांचीच साथ असल्याचे श्री. गोयल यांनी नमूद केले.

Reactions

Post a Comment

0 Comments