मार्ग फाऊंडेशनचे महापर्व कला महोत्सव उत्साहात पार पडला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

मार्ग फाऊंडेशनचे महापर्व कला महोत्सव उत्साहात पार पडला

 मार्ग फाऊंडेशनचे महापर्व कला महोत्सव उत्साहात पार पडला



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मार्ग फाऊंडेशनचे संस्थापक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापर्व कला महोत्सव उत्साहात पार पडला.या महोत्सवात मेहंदी, रांगोळी,पाककला, चित्रकला, हस्तकला यांसह इतर अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध वयोगटातील स्पर्धकांनी कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा अप्रतिम आविष्कार सादर करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या स्पर्धेमुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कला महोत्सवामुळे नवोदित कलाकारांनाही त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली आणि अनुभवी कलाकारांबरोबर अनुभवांची देवाणघेवाण यानिमित्ताने करण्यात आली. बक्षीस वितरण समाजसेविका सायरा शेख, सौंदर्य तज्ज्ञ सोनल पांचाळ यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आसिफ यत्नाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजिका उषा कसबे, तब्बसूम शेख, मिसबाह शेख,निकिता वाघमारे, वैष्णवी गवळी आणि मार्ग फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages