अॅड.सोमेश वैद्य यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

अॅड.सोमेश वैद्य यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा

अॅड.सोमेश वैद्य यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जनता दक्षिण भारतीय पार्टीने सोलापूरसाठी आ.सुभाष देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे स्वयम्शि क्षा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.सोमेश वैद्य यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.गुरूवारी (दि. २४) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.महिन्याभरापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता.त्यांना भाजपमधील सहा ते सात माजी नगरसेवकांचा पाठिंबा होता. लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु पक्षाने विद्यमान आमदारांवर विश्वास ठेवत त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे आता दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष म्हणून सोमेश वैद्य या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार आहेत.मागील तीन महिन्यांपासून अॅड. वैद्य यांनी दक्षिण विधानसभा
मतदारसंघात आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधून घेतले. या भागातील शेतकरी,महिला, युवक, बेरोजगार यांच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.


 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages