धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बायपास मित्र मंडळ ,रवि राठी मित्र परिवार तर्फे खिचडी वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 11, 2024

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बायपास मित्र मंडळ ,रवि राठी मित्र परिवार तर्फे खिचडी वाटप

 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बायपास मित्र मंडळ,रवि राठी मित्र परिवार तर्फे खिचडी वाटप


मुर्तीजापुर (कटूसत्य वृत्त):-धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी बायपास मित्र मंडळ तथा रवी राठी मित्रपरिवार यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली. १२ ऑक्टोंबर ला नागपूर येथे मोठ्या संख्येने बौद्ध धर्मीय भाविक नागपूर येथे दीक्षाभूमीवर जात असतात याच भाविकांची सेवा म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील बायपास वर बायपास मित्र मंडळ तथा रवी राठी मित्रपरिवार यांच्यातर्फे थंड पेय व खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांच्या उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना पुष्प अर्पण करून या खिचडी वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका बार्शीटाकळी अध्यक्ष सतीश पाटील, रवी गावंडे, धीरज पाटील, सुधीर शेवने भूषण अंभोरे, सागर बर्डे, प्रशांत अंभोरे, सचिन हिवराळे, सौरभ शेंडे, सुरज मानवतकर, आकाश घोडे, पंकज गवई, रोहित मोहोळ, रंजीत मोहोळ, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages