जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरुनगर सोलापूर येथे जागतिक अंडी दिन साजरा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक अंडी दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर या ठिकाणी पशुसंवर्धन विभागामार्फत अंडी वाटप करून व दैनंदिन आहारात अंड्याचे महत्व सांगण्यात आले.हा कार्यक्रम जर वर्षी ऑक्टोंबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी पशुसंवर्धन विभागा मार्फत घेतला जातो सदर कार्यक्रमास बालाजी फार्मस बाणेगाव उत्तर सोलापूर चे मालक मि.व्यंकटराव आणि डॉ शिवाजी भोसले यांनी मोफत अंडी देऊन व उपस्थित राहून सहकार्य केले तसेच मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सोलापूर डॉ समीर बोरकर साहेब, मा. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे साहेब, सहा आयुक्त डॉ अजय सुपे साहेब, सहा. आयुक्त डॉ विशाल येवले साहेब,पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक ) पशुसंवर्धन विभाग ,जिल्हा परिषद सोलापूर डॉ प्रदिप रणवरे साहेब यांनी उपस्थित राहून अंडी दिनानिमित्त अंड्याचे मानवीय आहारातील महत्व सांगितले आणि मुलांना अंडी वाटप करण्यात आले व मार्गदर्शन करण्यात आले आज या निमित्त जिल्हाभर सर्व पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी विविध ठिकाणी अंडी वाटप करून अंड्याचे महत्व लोकांना पटवून देऊन जागतिक अंडी दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
0 Comments