आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत प्रीती राठोडला सुवर्ण तर शिवराज बोळकोठेला कांस्य पदक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमी मंद्रुपची खेळाडू प्रीती मोहन राठोड हिने ४६ ते ४९ किलो वजनी गटात सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले. तर शिवराज बोळकोठे याने ५४ ते ५८ वजनी गटात कांस्य पदक मिळवले. सुवर्णपदक विजेती खेळाडू राठोड हिची सोलापूर विद्यापीठ संघात निवड झाली आहे. मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात या तायक्वांदो स्पर्धा झाल्या. यामध्ये दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमी मंद्रूपची खेळाडू प्रीती राठोड हिने सुवर्णपदक पटकावले. निवड झालेल्या या खेळाडूला दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमी मंद्रूपचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले. सोलापूर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष आमदार शहाजीबापू पाटील, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओंबासे, प्रमोद दौंडे, नेताजी पवार,दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे, रेश्मा राठोड, दिपक धुळखेडे, सचिन कुंभार, सिद्धाराम विजापूरे यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments