सामान्य कार्यकर्त्याला न्याय भाजपातच मिळतो:अमोल गायकवाड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाजपा हा सामान्य कार्यकत्यांना न्याय देणारा पक्ष आहे. माझ्यासारख्या अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकत्यांला भाजपा भटके विमुक्त युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष पदावर बसविण्याची दानत फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच आहे. हे वर्षे निवडणुकांचे आहे, आगामी काळात राज्याच्या कानाकोपऱ्यात जात, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेत, नेते आणि कार्य यांच्याशी समन्वय ठेवत निश्चितपणाने काम करेन, अगदी प्रामाणिक काम करत पक्षनेतृत्वाने दिलेल्या संधीचे सोने.भटके विमुक्त युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी अमोल गायकवाड यांची फेरनियुक्ती!
भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड साहेब, प्रदेश प्रभारी संजयजी केळकर साहेब, राहुल भैय्या केंद्रे यांच्या मान्यतेने भाजपा भटके विमुक्त युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी भाजपाचा आक्रमक युवा चेहरा असलेल्या अमोल गायकवाड यांच्यावर भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी फेरनिवड कऱण्यात आली, अमोल गायकवाड यांच्याकडे पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असताना
भटके समाजावर असलेल्या समस्या शासन दरबारी लावून धरून कामाचे अंमलबजावणी केली आणि संघटनात्मक कामामुळे पक्षात त्यांचे स्थान अजून भक्कम झाले भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबतच रोखठोक भूमिका मांडण्यासाठी त्यांची ओळख आहे. अगदी काळात आणि कमी वयात त्यांना भारतीय जनता पार्टीन संघटनात्यक दृष्टीने अत्यंत महत्वाची जबाबदारी असलेल्या भाजप भटके विमुक्त युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष पदावर फेरनिवड केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. निवडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चद्रशेखर बावनकुळे साहेब, आ.सुभाष देशमुख, आ.नरेंद्रपवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनीष भैय्या देशमुख, यांच्यासह भाजपा मित्रपक्षाच्या जिल्ह्यातील अनेक पदाधिका-यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या..!
0 Comments