शारदेय नवरात्र उत्सवाचे अंबामातेच्या मिरवणुकीने
पिंपरी दुमाला येथे सांगता
नगर (कटूसत्य वृत्त):-गेल्या नऊ दिवसांपासून संपूर्ण देशात उत्साहाने व भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा झाला आहे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शिरूर तालुका मधील पिंपरी दुमाला येथील माता अंबाबाई ची मिरवणूक अतिशय उत्साहामध्ये पार पडली
शिरूर तालुक्यामधील बहुतांश सर्वच ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मातेच उत्सव नेहमी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यावर्षी नऊ दिवस विविध रूपातील आकर्षक पूजेची मांडणी करण्यात आली होती
घटस्थापना ते दसरा या कालावधीत अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अंबाबाई स्थापना केलेल्या जागेला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती अंबामाता नवरात्र उत्सवाच्या कमिटीच्या वतीने भजन गरबा दांडिया गोंधळ देवीची मिरवणूक कार्यक्रमासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते दसरा निमित्त हनुमान मंदिर येथे सिमोलघणासाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली होती
अंबामातेच्या मिरवणुकीमध्ये महिला तसेच बालगोपाळांनी महाराष्ट्राचे परंपरा जोपासणारी वेशभूषा परिधान करून मिरवणुकीमध्ये एक वेगळा उत्सव आनंद निर्माण केला ग्रामपंचायत पिंपरी दुमाला विविध विकास सोसायटी गावातील आजी-माजी पदाधिकारी विविध संस्थांवरील अध्यक्ष उपाध्यक्ष आदी लोकांनी सहभाग नोंदवला
0 Comments