दहा वर्ष प्रशासकीय सेवेनंतर राज्यकर उपायुक्त (जीएसटी) या पदी पिंपरी दुमालाचे सचिन चिखले यांची पदोन्नती
शिरूर (कटूसत्य वृत्त):-वस्तू व सेवा कर(जीएसटी) विभागात सहाय्यक राज्यकर आयुक्त (गट - अ)या पदावर कार्यरत असलेले पिंपरी दुमाला गावचे सचिन चिखले यांची दहा वर्षे प्रशासकीय सेवेनंतर राज्यकर उपायुक्त (जीएसटी )या पदावर बढती मिळाली असून ते सध्या माझगाव, मुंबई येथे कार्यरत आहेत.
विक्रीकर विभागात रुजू होण्यापूर्वी सन 2012 मध्ये पोलीस उपनिरीक्षक व सन 2013 मध्ये विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली असतानाही जिद्द आणि अभ्यासाच्या सातत्यातून सन 2014 मध्ये त्यांनी वर्ग-१ अधिकारी या पदाला गवसणी घातली व ते 2014 मध्ये सहाय्यक विक्रीकर आयुक्त(गट - अ) या पदावर मुंबई येथे रुजू झाले. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील असून शेती विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करून सध्या ते महाराष्ट्राच्या प्रशासनात चांगल्या रीतीने सेवा देत आहेत.
त्यांचे वडील शिवाजी गीताराम चिखले हे शेतीनिष्ठ शेतकरी तसेच त्यांचा मोठा भाऊ काळुराम शिवाजी चिखले हेही गावातील प्रगतिशील शेतकरी असून जिद्द आणि मेहनतीचा वारसा आपल्या परिवाराकडून मिळाल्याचे ते आवर्जून नमूद करतात
विशेषतः महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आदर्श शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 1997 साली शिवाजीराव चिखले यांना बहाल करण्यात आला होता सातत्याने आपल्या मुलांप्रती अधिकारी होण्याची पाहिलेले स्वप्न सत्यात उतारताना दिसत असून आज महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण अति संवेदनशील पदावरती काम करण्याचा बहुमान उपायुक्त सचिन चिखले यांना मिळाल्यामुळे पिंपरी दुमाला परिसरासह त्यांच्या सर्व कुटुंबीय व तालुका जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून आपण ज्या शाळेमधून शाळा शिकलो त्या शाळेमधून अधिकाधिक अधिकारी घडो अशी भावना उपायुक्त सचिन चिखले यांनी व्यक्त केली
0 Comments