बुधवारी पुन्हा. हरिहर पेठ परिसरात पुन्हा ,दोन गटांमध्ये तुफान राडा...!
अकोला (कटूसत्य वृत्त):- अकोल्यातील हरिहर पेठ येथे दोन दिवसांधी झालेल्या दोन गटातील राडा झाला होता यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 17 जणांना अटक केली तर 70 जणांवर गुन्हा दाखल केलाय.मात्र यानंतर पोलिसांनी चुकीच्या लोकांना ताब्यात घेतल असल्याचं म्हणत एका गटातील काही महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला होता..पोलिसांनी या लोकांची समजूत काढून परत पाठवलं होत मात्र काही जणांनी दुसऱ्या गटातील व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करीत दुसऱ्या गटाने जुने शहर पोलीस स्टेशनला आरोपीला अटक करावी या मागणीसाठी घेराव घातला..दोन्ही गटा कडून पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आल्याने काही काळ येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या नंतर पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल कार्याची प्रक्रिया सुरू केलीय..पोलिसांनी गुन्हे दखल करून आरोपीला अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर घेराव घालणारे परतले.. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग , अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी व जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हिलकर यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे.पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न तेवण्याचे आणि शांततेचं आवाहन केलं आहे.
0 Comments