दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळामध्ये करिअर घडवावे - प्रा. कुमठेकर
दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शारीरिक तंदुरुस्ती राखून विद्यार्थ्यांनी निरोगी जीवन जगावे. खेळामध्ये आपले कर्तुत्व दाखवावे, असे आवाहन लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बसवराज कुमठेकर यांनी केले.
मंद्रूप येथे शालेय तालुकास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने केले होते. यामध्ये १४, १७, व १९ वर्षे वयोगट मुले व मुली यांच्या तायक्वांदो स्पर्धा झाल्या. याचे उद्घाटन मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर व ज्येष्ठ क्रीडाशिक्षक श्रीधर टेळे, महात्मा फुले विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सुनील टेळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडाशिक्षक बळीराम कांबळे, व धुळेश्वर विद्यालय मंद्रूपचे रगटे सर, दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे, महिला प्रशिक्षका प्रीती राठोड उपस्थित होते.
लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बसवराज कुमठेकर यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मलकारी मदगोंडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंचचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक, पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वनाथ घाटे यांनी केले तर आभार शिवपुत्र म्हेत्रे यांनी मानले.

No comments:
Post a Comment