माजी आमदार राजन पाटील यांना मिळाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 27, 2024

माजी आमदार राजन पाटील यांना मिळाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा

 माजी आमदार राजन पाटील यांना मिळाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा यशस्वी करणाऱ्या मोहोळच्या माजी आमदार राजन पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या (राज्यमंत्री दर्जा) अध्यक्षपदी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे उपसचिव एपी शिंगाडे यांनी पाटील यांच्या निवडीचा अध्यादेश जारी केला आहे. अनगर अप्पर तहसीलच्या विरोधासाठी मोहोळ बंदचे आवाहन केलेले असतानाही या काळात माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेचे जोरदार स्वागत केले. या यात्रेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. ही यात्रा यशस्वीपणे पार पडल्यानंतर लगेच राजन पाटील यांना हे बक्षीस मिळाल्यामुळे मोहोळ तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages