शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व भागात शिवसेनेमधे मोठया संख्येने पक्षप्रवेश

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 29 सप्टेंबर रोजी सोलापूरच्या पूर्व भागातील सत्तर फूट रोडवर शिवसेना पक्षप्रवेशाचा जोरदार कार्यक्रम शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रम हा अमोल शिंदे आणि मनोज शेजवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमात शिवसेनेच्या विचारधारेला आणि शिवाजीराव सावंत यांच्या कार्यपद्धतीला मानणाऱ्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत विधानसभेच्या तोंडावर
जोरदार पक्षप्रवेश केला. हा भाग विधानसभेसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात येत असल्याने या मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार असल्याचे संकेत शिवाजीराव सावंत यांच्याकडून दिले गेले आहेत, अशी चर्चा होत आहे.
पद्मशाली, वडार अशा बहुविध समाजातून येणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना लक्षणीय संख्येने शिवसेना पक्षप्रवेश करायला प्रेरीत करण्यामधे समर्थ मोटे आणि सुनील निंबालकर यांचं मोठं योगदान मानलं जात आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी विशेष मेहनत घेतली, याची दखल शिवाजीराव सावंत यांनी घेतल्याचे दिसून आले.
0 Comments