कुर्डूवाडीतील रेल्वे भुयारी मार्गाचे काम दिवाळी नंतर सुरू होणार
आमदार संजय मामा शिंदे यांनी केले होते प्रयत्न
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- कुर्डूवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले रेल्वे गेट क्रमांक ३८ हे गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत होते. रेल्वेने नागरिकांना अनेक अडअडचणीना सामोरे जावे लागत असल्याने करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भुयारी मार्ग सुरू होण्याबाबत पत्र दिले होते. यामुळे रेल्वेच्या हद्दीतूनच भुयारी मार्ग करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चाचपणी देखील करण्यात आली असून दिवाळीनंतर भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यातून सांगण्यात आले आहे.
कुर्डूवाडीतील उड्डाण पुल व्हावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांतून वारंवार मागणी होत होती.परंतु त्याबाबतचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून द्यावा असे रेल्वेकडून कळविण्यात आले होते.त्यामुळे त्याबाबत गेल्या पाच वर्षात तोडगा न निघाल्याने शेवटी येथील रेल्वे गेट क्रमांक ३८ हे गेल्या पाच वर्षापासून रेल्वे विभागाकडून बंद केले आहे.यामुळे शहर दोन भागात विभागले गेले.त्याचा फटका शहराच्या आर्थिक उलाढालीवर सर्व बाजूने झाला.येथे उड्डाण पूल व्हावा म्हणून येथील लोकप्रतिनिधीं, पदाधिकारी,काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.परंतु नगरपालिका प्रशासनाकडून मात्र यावर कोणताच तोडगा निघत नसल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन रेल्वेच्या जागेतूनच नागरिकांसाठी पूर्णतः भुयारीमार्ग देण्याचे निश्चित केले आहे.याबाबत एडीआरएम यांच्यासह अनेक वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील स्थळाला भेटी देऊन पाहणी केली आहे. त्यामुळे रेल्वे भुयारी मार्गाबाबत रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेली तयारी पाहता नेमका हा मार्ग कधी सुरू होणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले ते मात्र दिवाळीनंतर भुयारी मार्ग सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी कुर्डूवाडी येथील भुयारी मार्ग सुरू करावा यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. याचबरोबर रेल्वे गेट येथे अधिकाऱ्या बरोबर पाहणी करून भुयारी मार्ग सुरू करण्याची त्यांनी मागणी केली होती. यामागणी नुसार दिवाळीनंतर भुयारी मार्ग सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
0 Comments