Hot Posts

6/recent/ticker-posts

भगिनी समाज संस्थेतर्फे शनिवारी शारदोत्सव कार्यक्रम

 भगिनी समाज संस्थेतर्फे शनिवारी शारदोत्सव कार्यक्रम

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भगिनी समाज संस्थेतर्फे शनिवार दि. 5 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता छत्रपती रंगभवन, सोलापूर येथे शारदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्ट अध्यक्षा विशाला दिवाणजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         भगिनी समाज ही महिलांच्या मनोरंजनासाठी महिलांनी तयार केलेली संस्था आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शनिवारी हा शारदोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सोलो नृत्य, सुगल नृत्य आणि समूह नृत्य अशा गटात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन
अध्यक्षा विशाला दिवाणजी यांनी केले आहे.
        या पत्रकार परिषदेस सुवर्णा कटारे, विजया म्हमाणे, सुलभा रहाणे, आरती कुसगल, किरण अंकुशकर, अर्चना पवार आदी उपस्थित होत्या.
Reactions

Post a Comment

0 Comments