"माढा तालुक्यात मराठा समाज आक्रमक "
जरांगे पाटलांच्या 7 ऑगस्ट च्या सोलापुर सभेला गर्दीचा रेकॉर्ड होईल
कुर्डूवाडी(कटूसत्य वृत्त):- राज्यात ज्यांच्या मराठा कुणबी नोंदी चा पुरावा सापडला अशा मराठा तरुणांनी लवकरात लवकर कुणबी मराठा प्रमाणपत्र काढावे. जातपडताळणी देखील लवकर करावे. सरकार या कुणबी नोंदी रद्द करण्याचा घाट रचत आहे पण एक जरी कुणबी मराठा नोंद रद्द झाली तर सरकार पडले म्हणुन समजा असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. सकल मराठा समाजाची माढा तालुका स्तरिय बैठक काल कुर्डूवाडी भोसरे श्रीराम डायनिंग हाॅल येथे संपन्न झाली.
मनोज जरांगे पाटिल यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण जनजागृती रॅली व सभांचा दुसरा टप्पा 7 ऑगस्ट पासुन पुढे सुरू होत आहे. सोलापुर येथे रॅली व सभा या नियोजित निमित्त माढा तालुक्यातील मराठा समाज एकत्र आला होता. सोलापुर येथे माढा तालुक्यातून 700 गाड्या भरुन समाजबांधव जातील. असा विश्वास यावेळी मराठा समाजाने व्यक्त केला. आत्तापर्यंत चे गर्दीचे सर्व रेकॉर्ड आगामी सात ऑगस्ट रोजी सोलापुर जिल्हा तोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. सोलापुर जिल्यातील मराठा समाजाची ताकद सरकारला दाखवुन देऊ असा आक्रमक पवित्रा या बैठकीत मराठा समाजाने घेतलेला पहायला मिळाला.
मराठा आरक्षण सोबत व्यावसायात देखील या
आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घ्या आणी ते वेळेवर परत फेडा. फक्त ट्रॅक्टर नव्हे तर तब्बल दिड व्यावसायात करिता कर्ज मिळते . मराठा समाजाने व्यावसायात देखील पडावे असाही सुर यावेळी बैठकीत निघाला.
माढा तालुका मराठा समाजाची बैठक जिजाऊ वंदना घेत सुरवात झाली . यावेळी माढा तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.
गाव तेथे मराठा आरक्षण जनजागृती काॅर्नर बैठका होणार आहेत. लवकरच प्रत्येक गावात सोलापुर येथील मनोज जरांगे यांची सभा , मराठा आरक्षण, व्यावसाय, जातपडताळणी प्रमाणपत्र , कुणबी नोंद या संदर्भात सविस्तर चिंतन मंथन केले जाणार असल्याची माहिती व्याख्याते हर्षल बागल यांनी दिली.

No comments:
Post a Comment