संजय पाटील घाटणेकरांनी घेतली शरद पवारांची भेट-भेटीत पवारांनी जाणुन घेतली माढ्यातील राजकीय परिस्थिती अन् इच्छुक नेते मंडळीची राजकीय पार्शवभुमी

माढा (कटूसत्य वृत्त):- काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे.माढा विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात माढा मतदार संघाचा शरद पवारांनी सविस्तर आढावा घेतला.शरद पवार गटाचे नेते संजय पाटील घाटणेकरांसमवेत शरद पवारांची पुण्यात एक तास बैठक झाली.या बैठकीत बैठकीत पवारांनी माढा विधानसभेच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.
एकीकडे माढा विधानसभा मतदार संघाचे मागील ६ टर्म पासुन असलेले विद्ममान आमदार बबनराव शिंदे हे अथवा त्यांचे पुत्र जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे पिता पुत्रा पैकी एक जण यंदाच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
तर दुसरीकडे मविआ मधुन माढ्याची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जाणार हे निश्चित असल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे.आपल्याच पदरात उमेदवारीची माळ पाडण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने फिल्डिंग लावली जात आहे.अश्यातच शरद पवारांनी तुतारी चिन्ह घेऊन निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या माढ्यातील नेते मंडळीची राजकीय पार्शवभुमी घाटणेकर यांच्या कडुन बैठकीतुन जाणुन घेतली आहे.
माढा लोकसभे प्रमाणे विधानसभा मतदार संघाच्या तिकीट जाहीर करण्याच्या मुद्यावरुन तसेच विद्ममान आमदारांच्या विरोधात आव्हान उभे करण्यासाठी तगड्या उमेदवारांच्या शोधात पवार असल्याचे बोलले जात असुन हाय व्होलटेज लढत या मतदार संघात लागणार असुन माढा मतदार संघाचे शरद पवार गटाचे तिकीट कुणाला मिळणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तिकीट जाहीर झाल्यावर विरोधकांमध्ये एकजुट राहील का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसभेप्रमाणे विधानसभेचे गणित चालणार ?-नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील विक्रमी मताधिक्याने निवडुण आले.माढा मतदार संघातुन मोहिते पाटलांना ५२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने या लोकसभेच्या गणितावर अनेक मंडळी सुत्रे मांडत निवडणुकीला सामोरे जाण्याच्या इराद्यात आहेत.आमदार बबनराव शिंदेना मतदार संघातील जनतेने तुमच्या वेळेस बघु..आता काय सांगु नका "असे म्हणत लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी स्पष्ट पणे म्हणणे जनतेने मांडले होते.त्यामुळे लोकसभेचे गञित विधानसभेला चालणार नसल्याचे बोलले जात आहे.
काॅग्रेस च्या मिनल साठेचा भेटी चा अजेंडा कायम-
माढ्याच्या काॅग्रसच्या नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे या विधानसभा निवडणुक लढविण्याच्या चर्चेत आहेत.काॅग्रेस पक्षात कार्यरत असलेला माढ्याचा साठे परिवार शरद पवार गटातील नेते मंडळीच्या उमेदवारीचा शब्द घेण्यासाठी भेटी घेताना दिसत आहे.मागील महिन्यात जयंत पाटलांची तर नुकतीच खासदार सुप्रिया सुळेची नगराध्यक्षा मिनल साठेनी त्यांचे पती दादासाहेब साठे व नगरसेवकांसमवेत भेट घेतली.साठे चा शरद पवार गटातील नेत्यांच्या भेटी घेण्याचा अजेंडा कायम आहे.
शरद पवार साहेबांची आणी माझी भेट झाली.या भेटीत राजकीय विषयांवर चर्चा झाली.तुतारी कडुन निवडणुक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यापैकी मी देखील दावेदार आणी निवडणुकीसाठी इच्छुक देखील आहे.माढा मतदार संघातील राजकीय परिस्थितीचा पवार साहेबांनी सविस्तर आढावा जाणुन घेतला.-संजय पाटील घाटणेकर
No comments:
Post a Comment