सालाबाद प्रमाणे श्री वेंकटेश्वर देवस्थानम येथे श्रावणातील पवित्रोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे
सोलापूर(कटूसत्यवृत्त):- पूर्व भागातील सुप्रसिद्ध असा वेंकटेश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्रावण मासातील पावित्रोत्सव कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे मंदिर समितीचे विश्वस्त व पदाधिकारी यांनी सांगितले.सदर पावित्रोत्सव कार्यक्रमात मानकरी निवडण्याकरिता पाच ऑगस्ट रोजी लकी ड्रॉ पद्धतीने सर्व देणगीदारांच्या माध्यमातून जमा केलेल्या पावत्यामधून पूजेचा मानकरी निवडण्यात येणार आहे.
यात श्रावण मासातील पवित्रोत्सव पूजे करिता एक हजार पाच भाग्यवान मानकरी निवडण्यात येणार असून व्यंकटेश्वर देवस्थान च्या भाविक भक्तांना विनंती करण्यात येते की 151/- रुपये इतक्या रकमेचा देणगी पावती करून चार ऑगस्टपर्यंत जमा करावे. असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात.
पावित्रोत्सव पूजे करिता जे भाग्यवान मानकरी निवडण्यात येणार आहेत त्यांना 19 ऑगस्ट 2024 ते 23 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या दिवसाचे पूजेचे मानकरी म्हणून निवडण्यात येईल. उर्वरित भाग्यवान भक्तांना पावित्रोत्सव च्या पूजेचा मान सात ऑगस्ट ते 31 ऑगस्ट च्या दरम्यान मिळणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर व परिसरातील भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने 151 रुपये देणगी देऊन पूजेत सहभाग होण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन मंदिर समितीचे विश्वस्त व पदाधिकारी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment