मांडलेल्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही केलेले नाही - खा. मोहिते पाटील

अकलूज (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारने मांडलेल्या बजेटमध्ये शेतकर्यांसाठी काही केलेले नाही. शेतकऱ्यांना लागणारे साहीत्य खतावरी टॅक्स कमी केलेला नाही. शेतकरी शेतीबरोबरच पशुपालन देखील करतात मात्र पशुपालनाला लागरे पुशखाद्यावरील देखील टॅक्स कमी केलेला नाही.असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
पुढे खासदार मोहिते पाटील म्हणाले,बिहार आसाम या भागामध्ये पूर नियंत्रणासाठी पैसे दिले परंतु महाराष्ट्र मध्ये सांगली कोल्हापूर सातारा गडचिरोली या भागात गेले अनेक वर्ष पूर येत होता मोठ्या प्रमाणावर जीवितहानी वित्तहानी होत होती.या भागासाठी देखील निधीची आवश्यकता होती मात्र तरतुद केलेली नाही. हे देशाचे बजट नसून दोनच राज्याचे बजट होते की काय या माध्यमातून वाटते.
या केंद्रीय आर्थिक बजेटच्या माध्यमातून महाराष्ट्राची पूरती निराशा झालेली आहे.देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सर्वात जास्त कररूपी महाराष्ट्रराज्य सिंहाचा वाट उचलतो तरी आपल्या राज्याला काहीही ठोस मिळालेले नाही.हे राज्यातील महायुतीतील नेते दिल्लीश्वरांना कायम घालीन लोटांगण वंदेन चरम करत असतात तरीदेखील महाराष्ट्राला व महाराष्ट्रातील जनतेला काहीही देऊ शकले नाहीत याच्या सारखी दुर्देवी गोष्ट नाही. महाराष्ट्रातील निष्क्रिय सरकारारला येणाऱ्या विधानसभेला राज्यातील जनता निश्चितच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.असेही खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले.
No comments:
Post a Comment