नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस मुलांची ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाडीतून मिरवणूक काढली. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 17, 2024

नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस मुलांची ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाडीतून मिरवणूक काढली.

 नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस मुलांची ट्रॅक्टर-ट्रॉली, 

बैलगाडीतून मिरवणूक काढली. 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-नव्या शैक्षणिक वर्षाचा शनिवारी पहिला दिवस. सकाळी मुलांची ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाडीतून मिरवणूक काढली. मिरवणूक शाळांच्या प्रवेशद्वारासमोर येताच शिक्षण संस्थाचालकांपासून मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिकांपासून कर्मचाऱ्यांनी मुलांचे जंगी स्वागत करताना दिमतीला बँड पथकही सज्ज होता. शाळा प्रवेशोत्सवात मुला-मुलींना मोफत गणवेश, शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला गतीही देण्यात आली. एकूणच ग्रामीण भागात शाळा प्रवेशोत्सवात पालक, ग्रामस्थही सहभागी झाले होते. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये शनिवारी शाळा प्रवेशोत्सव रंगला अन् सजलाही. सातमध्ये ट्रॅक्टरमधून आली मुले बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर, साकत येथे ट्रॅक्टर रॅली काढून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना फेटे घालून, गुलाब पुष्प व फुगे देऊन औक्षण करून गोड शिरा देऊन स्वागत केले. कार्यक्रमासाठी सर्व पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक प्रतापसिंह मोहिते, उपशिक्षिका सुरेखा मोरे आदी दिवशी नवी पुस्तके मिळाल्याने उपस्थित होते. गुळसडीत पुस्तके वाटप गुळसडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच विद्यार्थी खूश झाल्याचे दिसत होते. यावेळी मुख्याध्यापिका मंजूषा आव्हाड, शिक्षिका संगीता बीडगर, शिक्षक चंद्रहास शिंदे यांच्या नियोजनाखाली शाळेत प्रवेश उत्सव पार पडला. यावेळी प्रथमच शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कागदी टोप्या घालून फुलपाखराचे रंगीत चित्र असलेल्या सेल्फी पॉइंटसोबत फोटो घेण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages