शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणारा गणवेश, बूट अन् पायमोजे विद्यार्थ्यांना मिळालीच नाहीत.
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाला शनिवारी प्रारंभ झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणारा गणवेश, बूट अन् पायमोजे विद्यार्थ्यांना मिळालीच नाहीत. एवढेच काय तर पुस्तकंही वर्गातील ५० टक्केच मुलांना देण्यात आली. ५० टक्के पुस्तकं कमी मिळाल्यानं पालकांनी अनेक शाळांमध्ये वाद घातला. यामुळे शिक्षकांना विनाकारण पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, बूट, पायमोजे मिळणार, पाठ्यपुस्तकं मिळणार अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. पुस्तकाबाबत मागणी शाळांकडून घेण्यात आली होती. त्यानंतर असा अहवाल बालभारती मंडळाकडे पाठविण्यात आला होता. मात्र मागणीच्या तुलनेत पुस्तकांचा पुरवठाच कमी झाल्याने अनेक शाळांना पस्तकेच देण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर ज्या शाळांना पुस्तके दिली तेही पटसंख्येच्या तलनेत कमीच देण्यात आली. त्यामळे शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप करताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती...
.jpg)
No comments:
Post a Comment