डोळ्यावर काळी पट्टी बांधून रक्तदान करून अनोखं आंदोलन
अकलुज,(कटूसत्य वृत्त):- सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी यांनी ठेकेदारांकडून टक्केवारी घेत माढा तालुक्यातील रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट व बोगस दर्जाची केल्याचा आरोप करत जनशक्ती संघटनेने सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या पुनम गेटवर डोळ्यावर काळी पट्टी बांधून रक्तदान करून अनोखं आंदोलन केले.
भ्रष्टाचारी अधिकारी संजय माळी यांची सखोल चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी संघटनेने या आंदोलनाद्वारे केली. दरम्यान भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या रक्तदान आंदोलनात ९४ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून निषेध व्यक्त केला. संस्थापक अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच असे आंदोलन झाले. या आंदोलनाची जिल्हाभर चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी ठेकेदारांकडून लाखो रुपयांच्या कामांमध्ये टक्केवारी घेतली आहे. बीड कॅपॅसिटी नसलेल्या ठेकेदारांना शासनाचा आदेश डावलून टक्केवारी घेत कामे दिली. टक्केवारी घेतल्यामुळे माढा तालुक्यात
झालेली कामे या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अत्यंत बोगस झाल्याचा आरोप जनशक्ती संघटनेने केला. यावेळी आंदोलकांनी राज्याचे बांधकाम मंत्री संजय चव्हाण व अधीक्षक अभियंता संजय माळी यांना रक्ताचा अभिषेक घातला. खून लो... मगर जान मत लो...! अशा घोषणा देत जिल्हा परिषद कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे
कार्यकर्ते राणा वाघमारे, गणेश वायभासे, रामराजे डोलारे, किशोर शिंदे, सोमा कातुरे, जयसिंग पाटील, बिभिषण शिरसट, महेश नरसाळे, रवींद्र नरसाळे, शहाजी नरसाळे, राहुल जाधव, शंकर नरसाळे, अक्षय देवडकर, सुशांत खूपसे, अभिमान गायकवाड, शरद सपाटे, गणेश ढोबळे, बापू मोहिते, सागर वावरे, ज्योतीराम ढोबळे लक्ष्मण मुळे, नागेश मुळे, अभिजीत गवळी,
बापू काशीद, अमोल बनसोडे, सुधीर पाटील, संजय कोरे, अभिजीत भोसले, संजय गायकवाड, गोरख चव्हाण, चंद्रकांत पुजारी, आप्पा कोठे, एकनाथ पवार, बाबासाहेब गायकवाड, सार्थक गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, महबूब शेख, मधुकर कांबळे, अभिमान तांबोळी, प्रकाश जावळे, सोमनाथ ओडिया यांच्यासह जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment