वडदेगांवचे माजी सरपंच आणि एस.पी. सिक्युरिटीजचे प्रमुख नारायण सुरवसे यांना पितृशोक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 17, 2024

वडदेगांवचे माजी सरपंच आणि एस.पी. सिक्युरिटीजचे प्रमुख नारायण सुरवसे यांना पितृशोक

 वडदेगांवचे माजी सरपंच आणि एस.पी. सिक्युरिटीजचे प्रमुख नारायण सुरवसे यांना पितृशोक 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- वडदेगांव येथील रहिवासी त्रिंबक ज्ञानदेव सुरवसे (वय 86 वर्षे) यांचे 17 जून रोजी पहाटे 3 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मोहोळ तालुक्यातील वडदेगांवचे माजी सरपंच आणि एस.पी. सिक्युरिटीजचे प्रमुख नारायण सुरवसे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्रिंबक सुरवसे हे वडदेगांव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष होते. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या उजनी धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते विशेष निमंत्रित होते. तसेच धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडाचे वारकरी होते. फडावरील भजन, कीर्तन, काकडा आरतीमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages