चव्हाणवाडी येथील बबन खडके यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

चव्हाणवाडी येथील बबन खडके यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

 चव्हाणवाडी येथील बबन खडके यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू 




टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त);- चव्हाणवाडी तालुका माढा येथील बबन परमेश्वर खडके राहणार चव्हाणवाडी यांचा शेतात ट्रॅक्टरने ऊस बांधत असताना विजेची वायर गुंडाळून शॉक लागून अचानक मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की चव्हाणवाडी येथील बबन परमेश्वर खडके वय 26 हे मोहन तुकाराम सलगर यांच्या बेंबळे हद्दीतील शेतात छोट्या ट्रॅक्टरने ऊस बांधत असताना ट्रॅक्टरच्या तात्याला अचानक विद्युत वायर गुंडाळली गेली. तो मोठ्याने ओरडला व खाली पडला. इतक्यात सदर वायर मोहन तुकाराम सलगर यांनी खुरप्याने कापली. तोपर्यंत तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्यानंतर सलगर यांचा मुलगा दीपक सलगर यांना फोन करून सदरची घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सुनील तानाजी चव्हाण राहणार बेंबळे घटनेच्या ठिकाणी आला. मोहन सलगर व तानाजी चव्हाण यांनी बबनला शेतातून रोड वरती आणले. नंतर दीपक सलगर यांनी चार चाकीतून बबन खडके यास उपचारासाठी मार्स हॉस्पिटल टेंभुर्णी येथे नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. सदर घटना 23 जून 2024 रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी घडली. अशी माहिती मोहन सलगर यांनी पोलीस स्टेशनला दिली. 
सदर घटनेमुळे चव्हाणवाडी गावात दुःखाचा डोंगर पसरला आहे तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages