जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना निमित्त जागरूकता कार्यक्रम
सोलापूर(कटूसत्य वृत्त);-जान्हवी फौंडेशन गेली ९ वर्षे पुणे शहर व ग्रामीण परिसरात व्यसनमुक्तीवर काम करत आहे. जागतिक अंमली पदार्थ समस्या लाखो लोकांना प्रभावित करते, ज्यामध्ये अमली पदार्थ वापर, अमली पदार्थांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यांचा समावेश आहे. याला संबोधित करण्यासाठी २६ जुन रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी या दिनाचे औचित्य साधून जान्हवी फौंडेशनने बोपोडी येथील डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन या शाळेत जागरूकता कार्यक्रमा चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ राजेंद्र प्रसाद या शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या शाळांमध्ये पोस्टर बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन या शाळेच्या सभागृहात सकाळी ११ नंतर आयोजित केला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment