पुण्यात दीड कोटींचा गुटखा जप्त; चौघे जेरबंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 17, 2024

पुण्यात दीड कोटींचा गुटखा जप्त; चौघे जेरबंद

 पुण्यात दीड कोटींचा गुटखा जप्त; चौघे जेरबंद

पुणे (कटूसत्य वृत्त):- नन्हे-आंबेगाव परिसरात पोलिसांनी शनिवारी (दि. १५) सुमारे दीड कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणातील चौघांना अटक केली असून, पुण्यातील दलाल नीलेश ललवानी पसार झाला आहे. पुष्पेंद्र अकबाल सिंग (वय २७), सुनील पत्थन सिंग (वय ४५), चंदन अजयपाल सिंग (वय ३२, सर्व रा. महानोरा, जी. उन्नाव, उत्तर प्रदेश), मुकेश कालूराम गेहलोत (वय २८, रा. मांडा, ता. मारवाड, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुटखा घेणारा नीलेश ललवाणी (वय ४०, रा. नन्हे) हा दलाल पसार झाला असून, त्याच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. महाराष्ट्रात गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात गुटखा शहरात आणून त्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्याबाबत शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी गेले काही दिवस पाळत ठेवली होती. नन्हे-आंबेगाव परिसरातील एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती या विभागाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून तब्बल एक कोटी ३६ लाख रुपये किमतीचा गुटख्याचा छापा हस्तगत केला. उत्तर प्रदेश व राजस्थानमधून हा गुटखा वितरित करण्यात आला होता. यासंदर्भात सखोल तपास जारी करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages