अवैध मद्याच्या वाहतुकीवर उत्पादन शुल्कची कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 17, 2024

अवैध मद्याच्या वाहतुकीवर उत्पादन शुल्कची कारवाई

 अवैध मद्याच्या वाहतुकीवर उत्पादन शुल्कची कारवाई


बारामती(कटूसत्य वृत्त):-राज्य उत्पादन शुल्कच्या दौंड विभाग पथकाने रविवारी (दि. १६ जून) नगर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी जात असलेल्या मद्याच्या वाहनांवर धडक कारवाई करून चौघांना अटक केली. नामदेव हरिभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे, महेश गुलाबराव औताडे (सर्व रा. अहमदनगर जिल्हा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपीकडून विदेशी मद्यासह ३० लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे यांच्या आदेशाने पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग बी. राजपुत, उपअधीक्षक उत्तमराव शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजक, जवान शुभम भोईटे, वाहनचालक केशव वामने, नवनाथ पडवळ, अशोक पाटील, चंद्रकांत इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रदीप झुंजरूक करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages