मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रतिनिधी मंडळाने
खा. शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माकपा अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रतिनिधी मंडळाने 'महाविकास आघाडी' चे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. माक्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या या प्रतिनिधी मंडळात माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, जे.पी. गावीत, विनोद निकोले, डॉ. डी.एल. कराड, डॉ. अजित नवले, एम.एच. शेख, डॉ. सुभाष जाधव यांचा समावेश होता.
सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षाचे खा. शरद पवार व आ. जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले. माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या १२ विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली. येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चासंदर्भातही चर्चा झाली. 'महाविकास आघाडी च्या इतर सर्व प्रमुख नेत्यांना माकपचे प्रतिनिधीमंडळ लवकरच भेटणार
.png)
No comments:
Post a Comment