'ती' योजना कागदावरच राहिली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील हुषार विद्याथ्यासाठी इयत्ता १० वीमध्ये ९२ टक्केतून अधिक मार्क मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सन २०२०-२०२१ या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांसाठी घोषणा केली होती. परंतु ती योजना कागदावरच राहिली. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी भीमसैनिक सामाजिक संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीकुमार नागटिळक यांच्याकडे नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सदर योजना अनुसूचित जाती, जमाती दुर्बल घटकासाठी डॉ. आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात येणार होती. परंतु शासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनुसुचित जातीमधील विद्यार्थी व पालकामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment