श्रीकांत मोरे यांनी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा मेळ घातला :-कुलगुरु प्रकाश महानवर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 17, 2024

श्रीकांत मोरे यांनी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा मेळ घातला :-कुलगुरु प्रकाश महानवर

श्रीकांत मोरे यांनी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा मेळ घातला 

:-कुलगुरु प्रकाश महानवर 



 सोलापूर(कटूसत्य वृत्त):-अनेक वेळा लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र दिसत नाहीत. मात्र मनोरमा परिवाराच्या माध्यमातून श्रीकांत मोरे यांनी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा मेळ घालून बँकेच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करताना साहित्यिकांच्याही सेवेमध्ये ते रमले आहेत.

देवदेवतांच्या पूजेपेक्षा आई- वडिलांच्या सेवेमध्ये सर्व काही आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रकाश महानवर यांनी केले. मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्यामनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. 'मनोरमा'चे श्रीकांत मोरे हे अध्यक्षस्थानी होते.

दरम्यान, ज्येष्ठ सिनेकलावंत अशोक समेळ यांनी सिने अभिनेत्री मधुरावेलणकर-साटम यांची मुलाखत घेऊन हास्याचे फवारे उडविले. ज्येष्ठ सिनेकलावंत अशोक समेळ, मधुरा वेलनकर-साटम, सुनिता पवार, अॅड. लखनसिंहकटरे, प्रा. डॉ. प्रमोद गोराडे, प्रा. आनंद मेणसे, संग्राम गायकवाड, अॅड. सुजाता जाधव, डॉ. ललित अधाने, डॉ. संदीप सांगळे, सुनेत्रा पंडित, प्रतापसिंह चव्हाण, चित्रा क्षीरसागर यांना मनोरमा साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अस्मिता गायकवाड आणि डॉ.कविता मुरुमकर यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, संतोष सुरवसे, निवड समितीचे अध्यक्ष डॉ. राजशेखर शिंदे, सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, अॅड.जे.जे. कुलकर्णी, कल्याण शिंदे, पद्माकर कुलकर्णी, अॅड. सुरेश गायकवाड, प्रा. नसिमा पठाण, गोविंद काळे, मीरा शेंडगे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages