सोलापूर शहरात अवैध धंद्यासह मटक्याचा सुळसुळाट पोलीस आयुक्तांची मात्र आळी मिळी गुपचिळी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 17, 2024

सोलापूर शहरात अवैध धंद्यासह मटक्याचा सुळसुळाट पोलीस आयुक्तांची मात्र आळी मिळी गुपचिळी

 सोलापूर शहरात अवैध धंद्यासह मटक्याचा सुळसुळाट 

पोलीस आयुक्तांची मात्र आळी मिळी गुपचिळी 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील अवैध व्यवसायाने पुन्हा जोर धरला असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस आयुक्तपदी एम. राजकुमार हे विराजमान झाल्यावर सोलापूर शहरातील अवैध धंद्यावर त्यांची करडी नजर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. परंतु त्यांची नजर नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. सोलापूर शहरातील बंद असलेल्या टपऱ्या पुन्हा सुरू झाले आहेत. आकडेमोड करणाऱ्या पाट्या खुलेआम झळखू लागले आहेत. सोलापूर शहरातील विशेषता कामगार वसाहतीमध्ये मटकाच्या पाट्या लावून अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत तर दुसरीकडे शहरातील मटका तसेच सर्वच प्रकारचे अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा नेहमी पोलीस प्रशासन करत असतो परंतु तसे होताना दिसत नाही. पोलीस आयुक्त पदी जेव्हा एम.राजकुमार हे विराजमान झाले. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, सोलापूर शहरात अवैध व्यवसायांना यापुढे थारा राहणार नाही. परंतु बिनधास्तपणे सोलापूर शहरांमध्ये अवैध धंद्यावाल्यांचा उच्चांक आहे. याकडे पोलीस आयुक्त कसे पाहतात हे समजेना. शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी, विडी घरकुल, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस स्टेशन आणि विशेषतः एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात कामगार वसाहत असल्याने मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य कामगारांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. आता विजापूर नाका पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नवीन बुकी चालकांकडून हा मटका व्यवसाय चालवला जात आहे असं सर्वत्र बोलले जात आहे. स्थानिक पोलीस स्टेशनच्या वसुलदारांकडून कडून हप्ते घेऊन हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे सर्व सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे. सध्या नुकतेच एमआयडीसी परिसरात नवीन बुकी चालकांचे हिम्मत वाढवणारे वसुलदार आहेत कारण यांच्या मदतीशिवाय हे अवैध व्यवसाय चालणे शक्यच नसते हिम्मत द्यायची मटका सुरू करायला लावायचा नंतर हप्ते वसूल करायचं अशा प्रकारातून 'तेरीबी चूप और मेरी बी चूप' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या विजापूर नाका, आसरा चौक, गौबीपीर अगदी औद्योगिक पोलीस चौकी जवळ, एमआयडीसी तसेच जोडभावी पेठ परिसरातील हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका सुरू सध्या अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. सध्या सर्व अवैध व्यवसाय सर्वत्र दिसून येत आहे पोलिसांकडून आर्थिक देवाणघेणेतून कारवाई केली जात नाही. असं नागरिकांतून बोलले जात आहे. सोलापूर शहरांमध्ये जोडभावी पेठ आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मटक्यांचा "कारंजे" फवारणारा हा एकमेव व्यक्ती आता नव्याने रुजू झाला आहे. "कारंजे" हेच जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यशस्वी मटक्याचा व्यवसाय करीत आता एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मटक्याचे  फवारणी करत आहेत. कारंजे हे मटक्याच्या व्यवसायामध्ये एमआयडीसी हद्दीमध्ये विराजमान झाल्यानं गेल्या दोन-तीन महिन्यापासून पूर्वीचे मटका मालकांनी मंथली न दिल्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी आणि वसुंधरा नाराज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारंजे यांच्याकडे मटक्याचा आता आल्याने आता पोलीस आणि वसुलदारांमध्ये नवचैतन्याचं वातावरण आहे. जो तो सर्वसाधारण कर्मचारी मटक्याच्या टपऱ्यावर जाऊन धंदा बंद करा असा दमदाटी देतात. परंतु लगेच तो टपरी चालक संबंधित व्यक्तीला फोन करून सांगतो आणि त्यांचा आर्थिक व्यवहार पूर्ण होतो. नंतर जैसे ते परिस्थिती मटका खुलेआम परंतु याकडे पोलीस आयुक्त एम.राजकुमार हे विशेष लक्ष देतील का हे पहावे लागणार आहे. अहो आयुक्त साहेब आपण एक शिस्तप्रिय व डॅशिंग अधिकारी आहात असे सांगताना. मग अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळा. हे आपण करू शकतात हे सोलापूरकर जनता मानु शकते. आयुक्त साहेब 'कहा राजा भोज, कहा गंगू तेली' अशी परिस्थिती आपली तर झालं नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे. हे आम्ही म्हणत नाही सर्वसामान्य सोलापूरकर म्हणत असतात. आयुक्त साहेब लवकरच सोलापूर शहरातील अवैध मटक्याचा व्यवसाय करणाऱ्याच्या मुसक्या कायदेशीर बाजूने आवळा नाहीतर पोलिसांवरील विश्वास उडेल आयुक्त साहेब. हे आपण करू शकता असा सर्वसामान्य सोलापूरकरांची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages