अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 17, 2024

अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता...

 अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या 

राजमाता म्हणजे जिजाऊ माता...

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त डाळिंब शिंदे चौक येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जिजाऊ माँ साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .यानंतर सामूहिक जिजाऊ वंदना करण्यात आली .यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६६४ साली जिजाऊंन रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता. विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे.

जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना शिवरायांना जिजाऊंचे संस्कार लाभले अशी प्रतिक्रिया सुनंदा साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केली...

     यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे राजन जाधव सुभाष पवार अंबादास शेळके बजरंग जाधव  भाऊसाहेब रोडगे  सदाशिव पवार नितीन जाधव मोहन खामीतकर नितीन मोहिते उज्वला साळुंखे सुनंदा साळुंखे मनीषा नलावडे  निर्मलाताई शेळवणे, प्रकाश ननवरे, सचिन चव्हाण, प्रकाश डोंगरे ,नागनाथ पवार ,अंबादास सपकाळे ,नितीन मोहिते ,राम माने, प्रदीप कळंब, राजू व्यवहारे, नितीन जाधव, वर्षाराणी पवार, मनाली जाधव, अनिषा जाधव, परशुराम पवार, कुमार सिरसागर, गोवर्धन गुंड, गजानन साळुंखे, जीवन यादव,उपस्थित होते...

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages