- Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 18, 2024

 खासदार प्रणिती शिंदे गावभेट दौऱ्यातून मोहोळ तालुक्यातील शेटफळ, वाफळे, देवडी, तेलंगवाडी, हिवरे या गावांना भेट देऊन नागरिकांच्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. 


 सोलापूर(कटूसत्य वृत्त);-सोलापूर,खासदार प्रणिती शिंदे ह्या प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंर मोहोळ तालुक्यातील मायबाप जनतेचे कृतज्ञता आणि आभार मानण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी 'गावभेट दौरा' आयोजित केला होता. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मोहोळ तालुक्यातील शेटफळ, वाफळे, देवडी, तेलंगवाडी, हिवरे या गावांना भेट देऊन जनतेचे आभार मानले. तसेच शेटफळ, वाफळे, देवडी, तेलंगवाडी, हिवरे गावातील नागरिकांच्या समस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जाणून घेतल्या. आणि ताबडतोब नागरिकांच्या समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन तात्काळ निवारण करण्याच्या सूचना केल्या.नागरीकांच्या समस्या त्यांच्याच गावात अधिकाऱ्यांच्या समक्ष ऐकून त्या तात्काळ सोडवल्याने लोकांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे व त्यांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे.या गावभेट दौऱ्यात सुलेमान तांबोळी, राजेश पवार, मनोज यलगुलवार, महादेव जवंजाळ, दिलीप वागज, संतोष पाटील, अनिल चव्हाण, राजेंद्र सर्जे, अतुल.मोरे, आकाश कानगुडे, उमेश मोरे, यांच्यासह विस्तार अधिकारी देशमुख, वाघमारे, PSI प्रशांत भागवत, कृषी सहायक वाघमोडे, सहायक अभियंता सागर शेळके, ग्रामसेवक भोसले, तलाठी पाटोळे, यांच्यासह इतर अधिकारी वर्ग, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages