अन्नछत्र मंडळाचा स्वामींचा प्रसाद मिळाला कि खऱ्या अर्थाने भक्तांची भूक तृप्त होते- हार्दिक जोशी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

अन्नछत्र मंडळाचा स्वामींचा प्रसाद मिळाला कि खऱ्या अर्थाने भक्तांची भूक तृप्त होते- हार्दिक जोशी

 अन्नछत्र मंडळाचा स्वामींचा प्रसाद मिळाला कि खऱ्या अर्थाने भक्तांची भूक तृप्त होते- हार्दिक जोशी



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिकतेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक या उपक्रमांना देखील प्राधान्यक्रम दिले आहे हे महत्वपूर्ण असून, अन्नछत्र मंडळाचा स्वामींचा प्रसाद मिळाला कि खऱ्या अर्थाने भक्तांची भूक तृप्त होते असे मनोगत प्रसिद्ध मराठी मालिका तुज्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी (राणा) यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. हार्दिक जोशी (राणा) यांच्या पत्नी अक्षया जोशी (अंजलीबाई) या उपस्थित होत्या. त्यांच्या समवेत निलेश स्वामी, चन्नय्या स्वामी हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, शहाजीबापू यादव, निखील पाटील, संतोष जाधव, गोटू माने, योगेश कटारे, पिट्टू साठे, संकेतराव शिंदे, बलभीम पवार, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विठ्ठल रेड्डी, विश्वनाथ कलशेट्टी, खंडेराय होटकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages