नागेश करजगी ऑर्किड शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

नागेश करजगी ऑर्किड शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 नागेश करजगी ऑर्किड शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे,प्री.प्रायमरी इनचार्ज अन्नपूर्णा अनगोंडा उपस्थित होत्या.
शाळेच्या मैदानावर शाळेचे क्रीडा व योग शिक्षक आनंद लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगासने सादर केली.
यावेळी संस्थेचे प्रमुख डॉ.कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारत ही योग भूमी म्हणून परिचित आहे.नियमित योगा केल्यास आपले मन आणि शरीर मजबूत होते.त्याच प्रमाणे आपली बुद्धी देखील तल्लख होण्यास मदत होते.असे मनोगत प्राचार्या रुपाली हजारे यांनी व्यक्त करून, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या पूर्वजांनी दिलेल्या या अमूल्य ठेवेची जाणीव ठेवत, वैभवशाली इतिहास जपत,प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अनुजा सुसलादी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages