भारतीय संघातुन निवृत्ती क्रिकेटपटु केदार जाधवांनी घेतले श्री.माढेश्वरी देवीचे दर्शन घेतले दर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

भारतीय संघातुन निवृत्ती क्रिकेटपटु केदार जाधवांनी घेतले श्री.माढेश्वरी देवीचे दर्शन घेतले दर्शन

 भारतीय संघातुन निवृत्ती क्रिकेटपटु केदार जाधवांनी घेतले श्री.माढेश्वरी देवीचे दर्शन घेतले दर्शन 


माढा (कटूसत्य वृत्त):- भारतीय क्रिकेट संघातून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेले केदार जाधव हे रविवारी दुपारी माढा तालुक्यातील जाधववाडी या मुळ गावी आले होते.त्यांनी शेतात वेळ घालवत पिकांची पाहणी केली.त्यानंतर माढ्याचे ग्रामदैवत श्री माढेश्वरी मंदिरास भेट देऊन त्यांनी माढेश्वरी  देवीचे सहकुटूंब दर्शन घेतले.पुरातत्व विभागाच्या वतीने सुरु असलेल्या मंदिराच्या कामांची त्यांनी पाहणी करीत माहिती जाणुन घेतली.
महाराष्ट्रासाठी आणी देशाच्या कल्याणासाठी  संधी मिळाली तर राजकारणात येण्या संदर्भात विचार करता 
येईल असे संकेत देखील यावेळी केदार जाधव यांनी बोलताना दिले.मात्र या संदर्भात अधीक  बोलणे टाळले.जाधव  कुटूबिंय यावेळी उपस्थित होते.
चौकट) देवीला  साकडं घातलं मात्र पुर्ण झाल्यावर सांगणार-श्री माढेश्वरी देवीचे दर्शन घेतल्यानंतर केदार जाधव यांना पत्रकारांनी विचारले देवीला काय साकंड घातले असं विचारले असता जाधव यांनी देवीच्या चरणी दर्शन घेऊन साकडं घातलंय.मात्र ते साकडं देवीने पुर्ण केल्यावरच त्याची माहिती आपणास दिली जाईल असे केदार जाधव यांनी  म्हटले.
चौकट]मोठी स्वप्न पहा नक्कीच पुर्ण होतील,अनेक केदार घडतील-मी देखील ग्रामीण भागातुनच घडलो आहे.
आजच्या  तरुणाईने क्रिकेटला टाईमपास म्हणुन न पाहता करियर च्या दृष्टीने पहावे.प्रामाणिक प्रयत्नांची पराकष्टा आणी सातत्य ठेवले तर तुम्ही देखील स्वप्न पुर्ण करु शकता.मोठी स्वप्न पहा आणी जिद्दीच्या,स्व कतृत्वाच्या बळावर सगळं काही शक्य होऊ शकते.अस जर प्रत्येकाने केले तर ग्रामीण भागातुन अनेक केदार जाधव घडतील

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages