पालकांनी केला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक गुरुजनांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 27, 2024

पालकांनी केला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक गुरुजनांचा सन्मान

 पालकांनी केला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक गुरुजनांचा सन्मान

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-कसबे तडवळे.आजही गुरुला समाजात मानाचे स्थान आहे त्याची प्रचिती ज्ञानाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कसबे तडवळे ' या गावात आली.  नवोदय प्रवेश पात्र झालेल्या मुलींच्या पालकांनी अविस्मरणीय अशी मायेची शाल,मानाचा फेटा, पुष्पहार भिंतीवरील घड्याळ देऊन शाळेतील एकूण 17 शिक्षकांचा यथोचित सत्कार केला.शिक्षक कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आजही प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अविरतपणे कार्य करतो याची जाणीव पालकांनी ठेवून शिक्षकांचा यथोचित सत्कार करून शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.

 'तडवळे पॅटर्न 'अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 यावर्षी आरोही शिंदे,समृद्धी टोणे, कादंबरी राठोड, कल्याणी हिलकुटे,सिद्धी सूर्यवंशी,वेदिका कुंभार, सिद्धी कस्तुरे व सोनाली पौळ या मुलींनी नवोदय परीक्षेतील जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळेचा यशाचा दबदबा कायम ठेवला.त्यामुळे या मुलींचा फेटा,हार,ट्रॉफी स्कूल बॅग, प्रत्येकी 3,205 रुपये रोख रक्कम देऊन यथोचित सन्मान शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांनी केला. या मुलींना अशोक शिंदे,विठ्ठल हिलकुटे विनोद चव्हाण, प्रकाश नरसिंगे विजयकुमार शिंदे डॉक्टर नितीन माने, सतीश पौळ  बापू पवार यांनी एकूण 25,640 रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली. धर्मराज शेंडगे यांनी या मुलींना स्कूल बॅग बक्षीस म्हणून दिल्या. शाळेतील स्पर्धा परीक्षेच्या वर्गासाठी डॉक्टर सच्चिदानंद कस्तुरे ढोकी 11,111 रुपये, लहू परसे ढोकी 4000 रुपये, विजयकुमार शिंदे वाखरवाडी 1100 रुपये,धर्मराज शेंडगे गोपाळवाडी 2100 रुपये, अंकुश अपुणे 1100 रुपये, असे एकूण 19411 रुपये शाळेला मदत निधी म्हणून दिले.

 नवोदय पात्र मुलींचे पालक अशोक शिंदे,वैभव टोणे दत्तात्रय राठोड,अतुल सूर्यवंशी,संभाजी कुंभार, सच्चिदानंद कस्तुरे,विठ्ठल हिलकुटे,सतीश पौळ  यांनी सत्काराचे आयोजन करून  मुख्याध्यापकांसाठी व्हीलचेअर,स्पर्धा परीक्षेच्या वर्गासाठी मॅट भेट म्हणून दिली. शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद सपत्नीक,जगन्नाथ धायगुडे सपत्नीक, संजय देशटवाड, गणपती यावलकर, शिलरक्षा शिंगाडे, देवेंद्र घायतिडक,लता वाघमारे,प्रवीण गाडे, सविता जमदाडे, शहाजी पुरी,अनिता देशमुख, योगिता अपराध,मनीषा गावखरे, राणी अंधारे,स्वाती कडबोने अर्चना यादव, शामल ताकपिरे या शिक्षकांचा यथोचित सन्मान पालकांनी केला.

गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद, विस्तार अधिकारी किशोरी जोशी, केंद्रप्रमुख जगदीश जाकते  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे भरभरून कौतुक केले.  सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले . कार्यक्रमाला धाराशिव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद विस्तार अधिकारी बापू शिंदे,तेरणा नगर बीटच्या विस्तार अधिकारी किशोरी जोशी,तडवळा केंद्राचे केंद्रप्रमुख जगदीश जाकते केंद्रीय मुख्याध्यापक केशव पवार,बाळासाहेब जमाले,शिक्षणप्रेमी पांडुरंग वाघ,दत्तात्रय टोणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ भोसले.उपाध्यक्ष शुभांगी करंजकर.सविता पवार,संतोष माळी मनीषा दिघे, देवकन्या जमाले,अनिल देशपांडे,राजनंदिनी कानगे, सौदागर होगले, संतोष गावखरे,सुभाष धनके व पालक उपस्थित होते. 

या दिमाखदार कार्यकमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय राठोड यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सय्यद रहिमान सर यांनी केले .कसबे तडवळे.आजही गुरुला समाजात मानाचे स्थान आहे त्याची प्रचिती ज्ञानाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कसबे तडवळे ' या गावात आली. मंगळवार दिनांक 25/06/24 रोजी नवोदय प्रवेश पात्र झालेल्या मुलींच्या पालकांनी अविस्मरणीय अशी मायेची शाल,मानाचा फेटा, पुष्पहार भिंतीवरील घड्याळ देऊन शाळेतील एकूण 17 शिक्षकांचा यथोचित सत्कार केला.शिक्षक कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आजही प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अविरतपणे कार्य करतो याची जाणीव पालकांनी ठेवून शिक्षकांचा यथोचित सत्कार करून शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.

 'तडवळे पॅटर्न 'अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 यावर्षी आरोही शिंदे,समृद्धी टोणे, कादंबरी राठोड, कल्याणी हिलकुटे,सिद्धी सूर्यवंशी,वेदिका कुंभार, सिद्धी कस्तुरे व सोनाली पौळ या मुलींनी नवोदय परीक्षेतील जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळेचा यशाचा दबदबा कायम ठेवला.त्यामुळे या मुलींचा फेटा,हार,ट्रॉफी स्कूल बॅग, प्रत्येकी 3,205 रुपये रोख रक्कम देऊन यथोचित सन्मान शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांनी केला. या मुलींना अशोक शिंदे,विठ्ठल हिलकुटे विनोद चव्हाण, प्रकाश नरसिंगे विजयकुमार शिंदे डॉक्टर नितीन माने, सतीश पौळ  बापू पवार यांनी एकूण 25,640 रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली. धर्मराज शेंडगे यांनी या मुलींना स्कूल बॅग बक्षीस म्हणून दिल्या. शाळेतील स्पर्धा परीक्षेच्या वर्गासाठी डॉक्टर सच्चिदानंद कस्तुरे ढोकी 11,111 रुपये, लहू परसे ढोकी 4000 रुपये, विजयकुमार शिंदे वाखरवाडी 1100 रुपये,धर्मराज शेंडगे गोपाळवाडी 2100 रुपये, अंकुश अपुणे 1100 रुपये, असे एकूण 19411 रुपये शाळेला मदत निधी म्हणून दिले.

 नवोदय पात्र मुलींचे पालक अशोक शिंदे,वैभव टोणे दत्तात्रय राठोड,अतुल सूर्यवंशी,संभाजी कुंभार, सच्चिदानंद कस्तुरे,विठ्ठल हिलकुटे,सतीश पौळ  यांनी सत्काराचे आयोजन करून  मुख्याध्यापकांसाठी व्हीलचेअर,स्पर्धा परीक्षेच्या वर्गासाठी मॅट भेट म्हणून दिली. शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद सपत्नीक,जगन्नाथ धायगुडे सपत्नीक, संजय देशटवाड, गणपती यावलकर, शिलरक्षा शिंगाडे, देवेंद्र घायतिडक,लता वाघमारे,प्रवीण गाडे, सविता जमदाडे, शहाजी पुरी,अनिता देशमुख, योगिता अपराध,मनीषा गावखरे, राणी अंधारे,स्वाती कडबोने अर्चना यादव, शामल ताकपिरे या शिक्षकांचा यथोचित सन्मान पालकांनी केला.गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद, विस्तार अधिकारी किशोरी जोशी, केंद्रप्रमुख जगदीश जाकते  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे भरभरून कौतुक केले.सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले 

कार्यक्रमाला धाराशिव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद विस्तार अधिकारी बापू शिंदे,तेरणा नगर बीटच्या विस्तार अधिकारी किशोरी जोशी,तडवळा केंद्राचे केंद्रप्रमुख जगदीश जाकते केंद्रीय मुख्याध्यापक केशव पवार,बाळासाहेब जमाले,शिक्षणप्रेमी पांडुरंग वाघ,दत्तात्रय टोणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ भोसले.उपाध्यक्ष शुभांगी करंजकर.सविता पवार,संतोष माळी मनीषा दिघे, देवकन्या जमाले,अनिल देशपांडे,राजनंदिनी कानगे, सौदागर होगले, संतोष गावखरे,सुभाष धनके व पालक उपस्थित होते.या दिमाखदार कार्यकमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय राठोड यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सय्यद रहिमान सर यांनी केले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages