नेताजी प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार होते . यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र मुलगे ,षडाक्षरी हिरेमठ उपस्थित होते.प्रथम राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अखिल जरबंडी, कावेरी पगड्याल, समर्थिनी मद्दानी,हेमा झुंजा, श्रावणी हिप्परगी, श्रुती मोरे,रोहन कलागते,विद्याश्री हिरतोट,तनुजा चिरमाडे,भावना येमूल,प्रथमेश नायकू,ऐश्वर्या बाबा,आकाश भैरामडी,अक्षिता कनकटी या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले. यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून शाहू महाराजांनी सुराज्य निर्माण करण्यावर भर दिले.बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट केले. सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. पुनर्विवाहाचा कायदा करुन विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिले. बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर विश्वाराध्य मठपती यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment