Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडी खेळीमेळीत संपन्न

माढा तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडी                                              खेळीमेळीत संपन्न                                                          

  सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुर्डूवाडी आज पुरोगामी पतसंस्थेच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ व कार्यकारिणीची सभा संपन्न झाली.
या सभेत सर्वांमध्ये एकमताने श्री हनुमंत मोतीलाल पिसाळ यांची पतसंस्थेच्या नूतन चेअरमन पदी निवड करण्यात आली.
तसेच व्हाईस चेअरमन पदी सुरेखा पाटील मॅडम यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी माढा विभागीय अध्यक्ष दिनकर शिंदे, माढा तालुका शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष कैलास काशीद, तालुका सरचिटणीस वामन गायकवाड पतसंस्थेचे जेष्ठ संचालक अशोक पाटील, विजयकुमार मुकणे, माधव गायकवाड, मावळते व्हाईस चेअरमन तात्यासाहेब राजगिरे, माजी व्हाईस चेअरमन अभिमन्यू काळभोर, मधुकर डोंगरे, तानाजी ढवळे, संचालक राजाभाऊ कदम,विठ्ठल गायकवाड, ज्ञानेश्वर चव्हाण, पतसंस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव प्रशांत होवाळ सोमेश्वर कुंभार आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments