शिवरायाचे जीवनचरित्र जगणेसाठी बुस्टर- अतिरिक्त सिईओ कोहिणकरजिल्हा परिषदेत शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिवनात संकटांवर मात करणेसाठी छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्राचे स्मरण करा. छत्रपती शिवरायाचे जीवनचरित्र जगणेसाठी बुस्टर आहे. असे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी व्यक्त केले. येथील जिल्हा परिषदेच्या
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आज जिल्हा परिषदेच्या
वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करणेत आले. शिवराज्य पूजन करून शिवराज्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी प्रा. कादर शेख ,माध्य. शिक्षणाधिकारी सचिन जगताप कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संजय पारसे आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी शिवरायांचे जिवनचरित्रावर मार्गदर्शन केले. मराठा सेवा संघाच्या वतीने गुणवंताच्या
सत्कार सोहळ्याचे आयोजन करणेत आले होते. जिल्हा परिषदेच्या आवारातील सहकार महर्षी शंकररीव मोहिते - पाटील यांचे पुतळ्या अतिरिक्त सिईओ कोहिणकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधुन शेळकंदे यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले.
सदर कार्यक्रमात स्वानंद टीचर म्युझिकल ग्रुप मोहोळ यांचा राष्ट्रगीत,राज्यगीत व शिवगीताचा कार्यक्रम पार पडला ,तसेच मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत पाल्याचा सन्मान व सत्कार तसेच सेवानिवृत्त वेतन प्रकरणे जलद गतीने मंजूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अधिक्षक अनिल जगताप, सुधाकर देशमुख , चेतन वाघमारे, चेतन भोसले,अजित देशमुख, श्रीकांत धोत्रे,आदम नाईक,राम जगदाळे आदीने परिश्रम घेतले व वाय पी कांबळे,गिरीश जाधव,नागेश पाटील,विवेक लिंगराज,तसेच जिल्हा परिषद येथील सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संभाजी आरमार चे डांगे व वाघमोडे यांचा गौरव अतिरिक्त सिईओ कोहिणकर यांचे हस्ते करणेत आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले तर महताब शेख यांनी आभार मानले.
0 Comments