महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवार गटाचे 10-12 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मुंबई (कटूसत्य वृत्त):- लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रासह देशातील राजकीय समिकरण बदलून टाकलं आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटाका बसला आहे.
मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजुने कौल दिला आहे. भाजपला वैयक्तिक मोठा धक्का बसला आहे. भाजपला महाराष्ट्रात केवळ 9 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाला अपेक्षित यश मिळालेले दिसत नाही तर अजित पवार गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. सध्याची परिस्थिती पाहाता राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे 10 ते 12 आमदार शरद परवारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले आपच्या संपर्कात अनेक आमदार आहेत. येत्या 9 जूनच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आहे. 10 जूनला राष्ट्रवादीचा स्थापना दिन आहे.
महाविकास आघाडीने कंबर कसली?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटातील 10 ते 12 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. इतकंच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदारांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारी दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मला सरकारमधून मोकळं करावं- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अशातच मला सरकारमधून मोकळं करावं, असे वक्तव्य करून गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रतात भाजपला मोठा धक्का बसला. भाजपच्या जागा कमी झाल्या असून अपेक्षित यश मिळाले नाही, याला मी नैतिक जबाबदार असून यापुढे मला पक्ष आपल्याला सरकारमधून मोकळं करावं असं विधान फडणवीस यांनी केलं आहे.
मी पक्षाला आणखी एक विनंती करणार आहे. आता मला विधानसभेकरीता पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळे मी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्तवाला विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. जेणेकरुन ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
0 Comments