लाखो लिटर पाणी वाया, आमचे महापालिकेला आवाहन,
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील सिद्धार्थ चौक येथे महापालिकेच्या हेड ऑफिस च्या वतीने पाईप लाईन च काम करण्यात आले होते.
मात्र काम अर्धवट व चुकीचे झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
एकीकडे शहरात पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
याची दखल घेत आम आदमी पार्टीने महापालिकेला तात्काळ आजच्या आज काम दुरुस्ती करा व वाया जाणारे पाणी थांबवा अन्यथा आपच्या वतीने महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरनळ्ळी, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, शिक्षक आघाडी अध्यक्ष बसवराज सरांगमठ, सागर उडानशिव तसेच अनेक स्थानिक उपस्थित होते.
0 Comments